दिल्लीत दौंडच्या सुपुत्राचा कृषी क्षेत्रात ठसा केंद्रीय कृषिमंत्र्यांचा समवेत वृक्षारोपण नैसर्गिक शेती व शेतकरी हिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा
July 17, 2026
0
🌱 दिल्लीत दौंडच्या सुपुत्राचा कृषी क्षेत्रात ठसा!
केंद्रीय कृषिमंत्र्यांसमवेत वृक्षारोपण, नैसर्गिक शेती व शेतकरी हिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा
दौंड | गणेश दिवेकर (मुख्य संपादक, सत्यवेध न्यूज)
दौंड तालुक्याचे सुपुत्र, प्रगतशील शेतकरी, कृषी सल्लागार तसेच जय मल्हार ॲग्रो कन्सल्टन्सी व जय मल्हार सोशल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. तुषार दिलीप हाके यांनी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कृषी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत शेतकरी हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडत दौंड तालुक्याचा गौरव वाढविला.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री मा. शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होत डॉ. हाके यांनी देशभर प्रभावी वृक्षलागवड अभियान राबविण्यासाठी विविध सूचना मांडल्या. त्यांच्या काही सूचनांवर अंमलबजावणी सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर ICAR Technology Portfolio for CSR Conclave मध्ये सहभागी होत भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) विकसित तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती आणि आधुनिक कृषी संशोधन राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जय मल्हार सोशल फाउंडेशनमार्फत सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्यमंत्री रामनाथ ठाकूर व भागीरथ चौधरी यांच्याशी वाढता रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांमुळे जमिनीचे होणारे नुकसान, उत्पादन खर्चातील वाढ, शेतकऱ्यांचे आरोग्य आणि नैसर्गिक शेतीचा विस्तार या विषयांवर सखोल चर्चा झाली. मातीचे आरोग्य संवर्धन, वृक्षलागवड आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनाही त्यांनी सुचविल्या.
भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI), नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञांशी संवाद साधून अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
"शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्यभर कार्य करणार"
यावेळी बोलताना डॉ. तुषार हाके म्हणाले, "माझा श्वास असेपर्यंत मी शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करत राहीन. नैसर्गिक शेती, वृक्षारोपण आणि वैज्ञानिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हेच माझे ध्येय आहे."
— मा.श्री.गणेश दिवेकर
मुख्य संपादक, सत्यवेध न्यूज
"शोध सत्याचा, वेध जनतेचा"

Post a Comment
0 Comments