Type Here to Get Search Results !

सत्यवेध न्यूज़

सत्यवेध न्यूज़

पुण्यात वारकरी भक्तीचा महासागर; संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखींचा दोन दिवस मुक्काम

पुण्यात वारकरी भक्तीचा महासागर; संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखींचा दोन दिवस मुक्काम पुणे | सत्यवेध न्यूज आषाढी वारी सोहळ्यानिमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आज पुणे शहरात दाखल झाल्या असून, दिनांक 9 व 10 जुलै रोजी दोन्ही पालखी सोहळ्यांचा पुणे येथे मुक्काम राहणार आहे. या निमित्ताने संपूर्ण पुणे शहर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाले असून, लाखो वारकरी, भाविक आणि नागरिक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. वारकरी संप्रदायाच्या शिस्तबद्ध परंपरेचे दर्शन घडवत दोन्ही पालख्या पुण्यात दाखल झाल्यानंतर विविध ठिकाणी भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह, रिंगण आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावर भाविकांकडून वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अन्नदान, वैद्यकीय सेवा तसेच इतर सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. दिनांक 11 जुलै रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरकडे, तर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणी (सासवड मार्गे) प्रस्थान करणार आहे. या प्रस्थानावेळीही हजारो वारकरी पालखीसोबत पुढील प्रवासाला निघणार असून, प्रशासनाने वाहतूक, सुरक्षा आणि आवश्यक सुविधांचे नियोजन केले आहे. पुण्यातील दोन दिवसांचा हा मुक्काम वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. "ज्ञानोबा-तुकोबा"च्या अखंड नामघोषाने पुणे नगरी भक्तिरसात तल्लीन झाली असून, सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळत आहे. — सत्यवेध न्यूज शोध सत्याचा... वेध जनतेचा www.satyavedh.in.net

Post a Comment

0 Comments